Cottan ret कापसाच्या भावात मोठे बदल भाव वाढणार

Spread the love

देशात कापसाच्या आवकेत मागील पाच ते सहा दिवसांत वाढ झाली आहे. सध्या प्रतिदिन सरासरी सव्वादोन लाख कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक होत असून, कापूसदरात कुठलीही सुधारणा दिसत नसल्याची स्थिती आहे.

 

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कापसाच्या भावात वाढ होणार हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

रुईच्या किंवा कापूसगाठींच्या दरातील पडझड काही दिवसांपूर्वी थांबली व रुईच्या दरात सुधारणा झाली. खंडीचे दर (३५६ किलो रुई) ५४ हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. परंतु त्यात वाढ होऊन दर ५४ हजार ५०० ते ५४ हजार ७०० रुपये असे झाले.

लागलीच सरकी दरात मात्र घसरण झाली. परिणामी, कापूसदरात वाढ दिसली नाही. दुसरीकडे अधिक आवकेने बाजारात दबावातच राहिला. राज्यात बाजार समित्या आणि खेडा खरेदीत कापूस दरात वाढीची प्रतीक्षा कायम आहे.

 

कापसाचे दर विभाग व क्षेत्रनिहाय वेगवेगळे आहेत.

रोज देशात सव्वादोन लाख गाठींची आवक होत आहे. देशात मागील पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी दोन लाख गाठींची आवक झाली. मागील पाच ते सहा दिवसांत कापसाची आवक देशात वाढून ती सव्वादोन लाख गाठींची रोज आवक होत आहे.

देशात एकूण १७५ लाख गाठींची आवक झाली आहे. मागील वर्षी जानेवारीअखेरपर्यंत १२० लाख गाठींची आवक झाली होती. सध्या खंडीला ५४ हजार ५०० रुपये दर आहे. रुईच्या दरात दरात कुठलीही मोठी घट झालेली नाही.

सरकार देणार आहे दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

सध्या देशात शेतकऱ्यांकडील कापूससाठाही कमी झाला असून, शेतकऱ्यांकडील साठा ३५ टक्के एवढा असल्याचे सांगितले जात आहे. काही भागांत यापेक्षा कमी साठा शेतकऱ्यांकडे आहे.

 

सरकीची आवकही जोमात

देशात सरकीची आवकही वेगात सुरू असून, रोज १० लाख क्विंटल सरकीची आवक होत आहे. सरकीची आवकही मागील सहा सात दिवसांत वाढली आहे. सरकी दरात काहीशी घट मागील १० ते १२ दिवसांत झाली असून, क्विंटलमागे १०० रुपये कमी झाले आहेत.

 

एक क्विंटल कापसात ६५ ते ६६ किलो सरकीचे उत्पादन मिळते. यामुळे कापूसदरात फारशी सुधारणा दिसत नसल्याची माहिती मिळाली.

 

Leave a Comment