आपण नंबर प्लेटच्या कोपऱ्यामध्ये आय एन डी का लिहितो

Spread the love

दुचाकी, कार, रिक्षा असो किंवा मालवाहू वाहनाची खरेदी केल्यानंतर तुम्हाला मोटार वाहन विभागाकडे ( आरटीओ ) नोंदणी करावी लागते. भारतात प्रत्येक वाहनाची नोंदणी मोटार वाहन कायदा १९८९ अंतर्गत केली जाते. आरटीओकडे नोंदणी केल्यावर चालकाला नंबर प्लेट मिळते, ज्यावर कोड आणि नंबर लिहिलेला असतो. काही नंबर प्लेटवर IND लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण, नंबर प्लेटवर IND काय लिहिले जाते? यामागाचं कारण काय? हे आपण जाणून घेणार आहोत.

महिलांसाठी आता मोफत गिरणी मिळणार सौरऊर्जेवरची हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

IND हा शब्द भारताला अनुसरून घेतला आहे. बऱ्याच वाहनांवरील नंबर प्लेटमध्ये होलोग्रामसह IND हा शब्द लिहिलेला असतो. IND शब्द उच्च सुरक्षा नंबर प्लेटचा एक भाग आहे. २००५ साली १९८९ च्या मोटार वाहन कायद्यात बदल करून उच्च सुरक्षा नंबर प्लेट आणली गेली. आरटीओच्या नोंदणीकृत नंबर प्लेटवर IND हा शब्द आढळतो.

विक्रेत्याने ही नंबर प्लेट कायद्यानुसार घेतली असेल, तर त्याच्यावर एक क्रोमियम-प्लेटेड होलोग्राम देखील जोडलेला आहे, जो काढला जाऊ शकत नाही. तसेच, नंबर प्लेटच्या सुरक्षतेबाबत काळजी घेण्यात आली आहे. यात ‘स्नॅप लॉक’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. जी काढता येत नाही. रस्त्याच्या कडेला उसलेल्या विक्रेत्यांनाही ‘स्नॅफ लॉक’ची नकल करता येत नाही.

ही नंबर प्लेट असलेल्या चालकांना वाहन चोरी, दहशतवादी आणि गैरवापरापासून संरक्षण मिळतं. तसेच, नंबर प्लेटवरील होलोग्रामवर असलेला कोड नोंद असतो. त्यामुळे कुठेही अपघात किंवा चुकीची घटना घडल्यास वाहनाच्या मालकाची माहिती तात्काळ मिळते. त्यामुळेच याला उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणतात.

 

Leave a Comment