चालू वर्षाचा खरीप पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Spread the love

Pik vima खरीप हंगामाचा पिक विमा भरणे चालू झालेले आहे, पेरणी झाल्यानंतर शेतकरी पिक विमा भरत असतात,व आता खरीप हंगाम चालू झाल्याने पिक विमा भरणे चालू झालेली आहे, त्याचप्रमाणे 31 जुलै ही पिक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा काढता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये शासना अंतर्गत एक रुपयांमध्ये पिक विमा योजना चालू करण्यात आलेली आहे, व यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे, पिक विमा योजना ही तीन वर्षासाठी असणार आहे. 2023 24 पासून ते 2025 26 पर्यंत शेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा योजना अंतर्गत लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की, पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

फक्त एक रुपया मध्ये विमा पॉलिसी काढून मिळेल हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

पिक विमा भरताना शेतकऱ्यांना जर सीएससी सेंटर धारक किंवा आपले सरकार केंद्र धारकांनी अतिरिक्त पैशाची मागणी केली असता शेतकरी तक्रार करू शकणार आहेत, कारण शासना अंतर्गत पिक विमा प्रति अर्ज 40 रुपये कमिशन आपले सरकार केंद्र धारकाला देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला समजलेले असेल की पीक पेरा स्वयंघोषणापत्र कसे मिळवायचे, खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करू शकता.

शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पीक पेरा स्वयंघोषणापत्र भरावी लागते, व पीक पेरा स्वयंघोषणापत्र असल्याशिवाय पिक विमा काढता येत नाही, व त्यामुळे पीक पेरा घोषणापत्र शेतकऱ्यांकडे उपलब्ध असावी लागते,व ती कशी उपलब्ध करायचे हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल परंतु पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करावें लागेल व, यासाठी कोणत्याही ठिकाणी न जाता तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करू शकता.

 

Leave a Comment