गुगल पे वापरता; ही कंपनी देणार वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या सविस्तर

Spread the love

गुगल पे वापरता; ही कंपनी देणार वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या सविस्तर

डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडने (डीएमआय) गुगल पेच्या पात्र वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक कर्ज देण्याची घोषणा केली. हे उत्पादन गुगल पेचे ग्राहक अनुभव आणि डीएमआयच्या डिजिटल कर्ज वितरण प्रक्रियेच्या दुहेरी फायद्यांचा लाभ घेते आणि नवीन कर्ज वापरकर्त्यांनाही या कक्षेत आणण्यास देखील मदत करेल. पात्र वापरकर्ते डीएमआय फायनान्सने निश्चित केलेले निकषानुसार पूर्व-पात्र आहेत आणि गुगल पेच्या माध्यमातून हे उत्पादन त्यांना उपलब्ध करून दिले जाते. या वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यातील मिळण्याबरोबरच त्यांच्या अर्जावर जवळपास रिअल-टाइममध्ये प्रक्रिया केली जाईल.

*👉📱आधार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*

गुगल पे वापरता; ही कंपनी देणार वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या सविस्तर

गुगल पे सोबत त्यांच्या वापरकर्त्यांसाठी हा एकात्मिक, वैयक्तिक कर्जाच्या प्रवास कायम सुरू ठेवतानाच डीएमआयने डिजिटल फायनान्स प्रणालीतील आघाडीच्या कंपन्यांच्या भागिदारीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण डिजिटल आर्थिक उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.


👉📲 *गुगल पे वर खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.*

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रती कर्ज एक लाख रुपयांपर्यंत वितरित केले जातील आणि त्याची कमाल ३६ महिन्यात परतफेड केली जाईल. ही भागीदारी १५ हजार पेक्षा जास्त पिन कोडवर सुरू करण्यात येत आहे

🎯🎯 *नगर परिषद भरती जिल्ह्यानुसार अर्ज सुरू*

व्यवस्थापकीय संचालक शिवाशिष चॅटर्जी म्हणाले की, आम्ही आमचे वैयक्तिक कर्ज उत्पादन भारतात गुगल पेवरर उपलब्ध करून देण्यासाठी उत्साहित आहोत. डीएमआयबाबत सांगायचे तर आम्ही वेगाने विस्तारत असलेल्या ग्राहक समूहाला सर्वोत्तम संभाव्य डिजिटल कर्जाचा अनुभव देण्यासाठी आमच्या एकत्रित सामर्थ्याचा फायदा घेऊन जागतिक दर्जाच्या सहकार्यांसह काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे . आमच्या चमूने लाखो गुगल – पे वापरकर्त्यांना पारदर्शक आणि विनाव्यत्यय कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एकत्र काम केले आहे पुढील वर्षांमध्ये ही नवीन भागीदारी वाढवण्याची आणि आणखी लाखो लोकांसाठी आर्थिक सर्वसमावेशकतेचे दिलेले आश्वासनन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

 

 

 

Leave a Comment