Kusum solar yojana कुसुम सोलार योजना विषयी आपल्याला सविस्तर महिती पहावयास मिळणार आहे. या योजनेचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहोचविणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप उपलब्ध करून दिले जाते. यातून शेतात लाखो रुपयांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होते. जिल्ह्यातील १४६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप लावण्यात आले आहेत.
यापूर्वी शेतकऱ्यांना विजेवर चालणारे कृषिपंप शासन उपलब्ध करून देत होते. त्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जात होते. मात्र, कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च केली जात होती. तसेच गावापासून शेत दूर राहत असल्याने तिथपर्यंत वीज पुरवठा करण्यास शासनाला लाखो रुपये खर्च येत होते. वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या गंभीर राहते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध करुन दिला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश राहतो. त्यामुळे सौर कृषिपंप पूर्ण क्षमतेने दिवसा काम करते. जवळपास आठ तास कृषिपंप चालले तर एका एकराला सिंचन होते.
काय आहे पीएम कुसुम योजना?
शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी मागील चार ते पाच वर्षांपासून केली जात आहे. भारनियमनाच्या समस्येपासून दूर राहता येते.
वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग करा हे पाहण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा.
कोणाला लाभ घेता येतो?
बोअर, विहीर, नाला, नदी आदी पाण्याची सुविधा असल्यास शेतकऱ्याला या योजनेचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे त्याने यापूर्वी कृषिपंपाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
निकष काय?
ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन आहे. जवळपास पाण्याचे साधन आहे. तसेच शासनाच्या इतर योजनेअंतर्गत कृषिपंपाचा लाभ घेतला नसल्यास या योजनेंतर्गत सदर शेतकऱ्याला कृषिपंप उपलब्ध करून दिला जातो.
महावितरण कंपनीमध्ये विविध पदाची भरती पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
कोणती कागदपत्रे आवश्यक
सातबारा
लाभार्थ्यांचे आधार कार्ड
पासपोर्ट फोटो
एससी, एसटी असल्यास जात प्रमाणपत्र
बँक पासबुक आवश्यक आहे.
उन्हाळ्यातही लाखोंचे उत्पादन
सौर कृषिपंप दिवसा पूर्ण क्षमतेने काम करतात. त्यामुळे उन्हाळ्यातही लाखो रुपयांचे उत्पादन घेणे शेतकऱ्याला शक्य होणार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळाल्या आहेत. त्या ठिकाणी सोलरपंप बसविता येणार आहे.
१४६ शेतकऱ्यांनी घेतला लाभ
योजनेची सुरुवात झाल्यापासून १४६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काहींची केवळ तपासणी सुरू आहे.
अर्ज कसा कराल –
अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. आजच्या स्थितीत आपण अर्ज लिंकच्या माध्यमातून अथवा ऑनलाइनसुद्धा सहजपणे भरू शकतो.