mahadbt farmer scheme 2023 | कृषी योजनेसाठी कोणत्याही वेळी अर्ज

Spread the love

mahadbt farmer scheme 2023 – शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही ‘आपले सरकार महाडीबीटी’ ( Mahadbt farmer scheme portal) वरून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 

आपले सरकार महाडीबीटी – Mahadbt farmer scheme 2023

 

‘आपले सरकार महाडीबीटी’ हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम आहे.

 

Mahadbt farmer scheme 2023: अंतर्गत सामान्य नागरिक , शेतकरी यांना शासकीय कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यात येतो. शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी ही योजना राबविण्यात येते.

 

 

Mahadbt farmer scheme 2023: या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील उत्तम उत्पादनासाठी, फळबाग, बी बियाणे, प्रकल्प आधारित घटक, काढणी पश्चात बाबी कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य स्वरूपात अनुदान दिले जाते.

 

MahaDBT farmer scheme portal वर जाऊन शेतकरी सर्व योजनेकरीता अर्ज करू शकतात.

 

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Mahadbt farmer scheme 2023: शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही ‘आपले सरकार महाडीबीटी’ ( Mahadbt farmer scheme portal) च्या पोर्टलवरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 

Mahadbt farmer scheme 2023: शेतकऱ्यांना त्यांनी केलेले अर्ज, अर्जाची सद्यस्थिती ही त्यांच्या वापरकर्ता आयडी वापरून लॉगिन करून कधीही तपासता येते. सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी 7/12 प्रमाणपत्र, 8 अ प्रमाणपत्र, आधार संलग्नित बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत इत्यादी अपलोड करू शकतात.

 

Mahadbt farmer scheme 2023: महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रकियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल अलर्टचीही तरतुद आहे. नोंदणीकृत अर्जदार, शेतकरी यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट लाभाचे वितरण करण्यात येते. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जाते. याशिवाय मंजुरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभरित्या राबविण्यात येते.

अटी नियम व पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Mahadbt farmer scheme 2023: अर्जदारांनी यासाठी मार्गदर्शक पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करून ‘आपले सरकार महाडीबीटी पोर्टल’वर कृषी योजनेचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी.  

 

 

mahadbt farmer scheme 2023: प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना PMKSY -प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन घटक) या योजनेतंर्गत ठिबक संच, तुषार संच या सिंचन साधनाचा 45 टक्के व 55 टक्के या अनुदान प्रमाणात उपलब्ध करुन दिले जातात. कृषि यांत्रिकीकरण उप-अभियान SMAM Krishi yantrikikaran योजनेतंर्गत ट्रॅक्टर व इतर औजारे व यंत्रे यांच्या खरेदीसाठी 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर ( Tractor scheme ) व इतर औजारे व यंत्रे यांच्या खरेदीसाठीही 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ( RKVY ) यांत्रिकीकरण, विहीर, कांदाचाळ, संरक्षित शेती यासाठी 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ( NFSM ) (कडधान्य, गळीतधान्य, कापूस ) या योजनेंतर्गत बी -बियाणे, यंत्र व अवजारे यांच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते .

 

तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत ठिबक सिंच व तुषार संच यांच्या खरेदीसाठी 25 टक्के व 30 टक्के अनुदान दिले जाते .एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदाचाळ, पॅक हाऊस ,

 

पॉलिहाऊस ,शेडनेटहाऊस ,शेततळे अस्तरीकरण या कामांसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, शोभिवंत फुलझाडे यांच्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते. यासाठी जास्तीत -जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर केवळ एक अर्ज सादर केल्यास शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेता येतो.

 

Leave a Comment