MahaDBT farmer scheme portal जाऊन शेतकरी सर्व योजनेकरीता अर्ज करू शकतात.
अटी व नियम व पात्रता
mahadbt farmer scheme 2023: कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित केलेल्या अटी आणि अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी अर्जदार पात्र आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल. अर्जदाराची पात्रता कोणत्याही स्तरावर अवैध आढळून आल्यास अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. कृषी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतात. अन्य कोणत्याही पध्दतीने भरलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत.
mahadbt farmer scheme 2023: पात्र अर्जाची लक्षांकाच्या अधिन राहून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अत्यंत पारदर्शकरित्या लॉटरी काढण्यात येते. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लॉटरीत निवड झाल्याबाबत कळविण्यात येते. लॉटरीत निवड झाल्यापासून दहा दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
mahadbt farmer scheme 2023: यानंतर कृषी विभागामार्फत कागदपत्रांची छाननी होऊन दहा दिवसात पूर्वसंमती पत्र देण्यात येईल पूर्वसंमती आपल्या लॉगिन वर लाभार्थ्यांना पाहता येईल यानंतर पूर्वसंमती मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत काम पूर्ण करून किंवा खरेदी करून देयके पोर्टलवर अपलोड करावी .देयके अपलोड केल्यानंतर प्रत्यक्ष मोका तपासणी होईल .
mahadbt farmer scheme 2023: मोका तपासणीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल .अशा पद्धतीने महाडीबीटी अंतर्गत सर्व प्रक्रिया या अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येतात.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय अथवा आपल्या तालुक्यातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.