पॅन कार्ड झटपट डाऊनलोड करा.

Spread the love
Pan Card : तुमचे पॅन कार्ड हरवलं तर आता चिंतेचे कारण नाही. तुम्ही घरबसल्याही दुसऱ्यांदा अर्ज करु शकता आणि पॅनकार्ड मिळवू शकता. त्यासाठी ही सोपी प्रक्रिया राबवावी लागेल.

नवी दिल्ली : आधाराकार्डसारखेच भारतीय नागरिकांकडे पॅनकार्ड (Pan Card)असणे आवश्यक आहे. तुमच्या आर्थिक व्यवहाराची जंत्री पॅनकार्डमुळे समजते. बँका कर्ज देताना पॅनकार्डची मागणी करतात. अनेक ठिकाणी पॅनकार्डची फोटोकॉपी (Photocopy)जोडणे आवश्यक आहे.

बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळावा म्हणून दाहा सोप्या पद्धती हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

पॅनकार्डवर तुमचा कायमस्वरुपी विशिष्ट क्रमांक असतो. मोठी रक्कम अथवा व्यवहार करताना तुम्हाला पॅनकार्डची गरज पडते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी तुम्हाला पॅनकार्डची गरज पडते. पॅनकार्डवर अल्फान्यूमेरिक क्रमांक (Alphanumeric) असतो. हा आयकर खात्याकडून देण्यात येतो.

अनेक व्यवहार यामुळे सुकर होतात. तसेच घर खरेदी, जमीन खरेदी, सोने खरेदीवेळी पॅनकार्ड मागणी करण्यात येते. तुमचे पॅन कार्ड हरवलं तर आता चिंतेचे कारण नाही. तुम्ही घरबसल्याही दुसऱ्यांदा अर्ज करु शकता आणि पॅनकार्ड मिळवू शकता. त्यासाठी ही सोपी प्रक्रिया राबवावी लागेल.

शेतकऱ्यांना व्याज मुक्त योजना तीन लाख हून पाच लाख वाढवली हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

तुमचे पॅनकार्ड हरवल्यास तुम्ही घरबसल्या त्यासाठी अर्ज (PAN Card Re-apply) करु शकता. त्याआधारे तुम्ही पॅनकार्ड पुन्हा प्राप्त करु शकता. पॅन कार्ड पुन्हा प्राप्त करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. अर्ज करताना तपशील द्यावा लागतो. तसेच 50 रुपये शुल्क अदा करावे लागते. त्यानंतर काही दिवसात तुमचे पॅनकार्ड घरपोच मिळते.

 

जर तुमचे पॅन कार्ड हरवले तर सर्वात अगोदर पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार द्या. पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहाराशी संबंधित महत्वपूर्ण कागदपत्र आहे. त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅन कार्ड हरवल्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करा. त्यानंतर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड साठी पुन्हा अर्ज द्या.

 

Leave a Comment