प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदती 31 जुलैपर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर 31 जुलै पर्यंत आपला पिक विमा भरून घ्या.
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन २०२३-२४ पासुन राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
एक रुपयांमध्ये पिक विमा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे आणि आता तुमच्या गावातील CSC केंद्र या ठिकाणी याचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तरी आपण आपल्या गावातील CSC केंद्रावर जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.
सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. pm pik vima.
सहभाग प्रक्रिया:
विमापात्र शेतकरी: कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारेई. सर्व शेतकरी.
शेत जमीन नावावर करण्यासाठी आता शंभर रुपयांच्या फोनचा उपयोग करा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कर्जदार शेतकरी: प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकन्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकन्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकाच्या ७ दिवस आधी संबंधीत बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधीत बँकेमार्फत करण्यात येईल.
बिगर कर्जदार शेतकरी: ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत अथवा सी एस सी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी.
कुळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार (Registered Agreement) अपलोड करणे बंधनकारक आहे.
विमा संरक्षित बाबी:
आधार कार्ड नियमात मोठा बदल हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकन्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणी नंतर 14 दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत Crop Insurance App/ विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक/बँक/ संबंधित बैंक/ कृषि विभाग यांना दयावी. सदरची जोखिन केवळ अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांनाच लागू होईल.
योजनेअंतर्गत अधिसुचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहून अधिसुचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते.