या शेतकर्‍यांना मिळणार नाही 13 वा हप्ता – PM Kisan Latest Update

Spread the love

या शेतकर्‍यांना मिळणार नाही 13 वा हप्ता – PM Kisan Latest Update

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी च्या अंतर्गत अनेक शेतकरी दर 4 महिन्याला विनाकारण अपात्र म्हणून बाहेर काढले जात आहेत. शेतकरी मित्रांनो तुमचं जर नाव या अपात्रच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला तेरावा हप्ता मिळणार नाही याकरिता तुम्हाला अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहणे खूप महत्त्वाचे आहे

 

ज्या शेतकऱ्यांचे काहीही कारण नसताना जर सरकार हप्ता देत नसेल तर त्या शेतकऱ्यांना त्याची सुधारणा करता आली पाहिजे याकरिता सरकारने एक नवीन पर्याय निवडलेला आहे आज आपण त्या पर्यायाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याकरिता खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. 

 

असे करा चेक तुम्हाला १३ वा हप्ता मिळणार का नाही

शेतकरी मित्रांनो तुम्हाला १३ वा हप्ता मिळणार का नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.

पीएम किसन अधिकृत वेबसाईट वरती जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आता तुमच्यासमोर पी एम केसांची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल.

खालील बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर व कॅप्चा कोड टाकून गेट डाटा या बटणावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर खाली एक नवीन रखाना ओपन झालेला दिसेल.

खालील सर्व माहिती तुमची बरोबर असणे आवश्यक आहे.

eKYC : YES , Eligibility : Yes , Land Seeding : Yes

वरील माहिती दिल्याप्रमाणे जर तुमची सर्व माहिती योग्य दिसत असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा १३ हप्ता मिळणार आहे.

वरील एकाही ऑप्शन मध्ये जर नो असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून भारतातील संपूर्ण शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जातात. शेतकऱ्यांना 4 महिन्याला दोन हजार असे वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात

 

आज आपण या योजनेसाठी नवीन नाव नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुमच्या नावावर जर जमीन आहे आणि तुम्ही अजून पर्यंत जर याचा लाभ घेतला नसेल तर या योजनेचा तुम्ही अवश्य लाभ घ्या कारण या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?

आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक )

रेशन कार्ड नंबर 12 अंकी ( तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानात मिळेल )

7/12 उतारा

8/अ उतारा

बँक पासबुक ची आवश्यकता नाही कारण तुमचे पेमेंट आधार पेमेंट मोड वरती येणार. तुमचे आधार कार्ड ज्या बँकेत NPCI ला लिंक आहे त्याच बँकेत तुमचे पैसे येणार आहेत.

 

Leave a Comment