Thibak shincn शेतामध्ये ठिबक सिंचन असले की शेतातील पिकामध्ये खूप चांगल्या प्रमाणात बदलत घडतात, कारण ठिबक सिंचनामुळे मिळणारे पाणी हे प्रत्येक पिकाला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर होण्यास मदत होते, त्यामुळे ठिबक सिंचन योजना ही महाराष्ट्र शासनाने राबविण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खूप चांगला प्रकारे लाभ होणार आहे.
कुसुम सोलर योजनेविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
Thibak Sinchan Subsidy योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे व यामध्ये शेतकऱ्यांनी अर्ज भरायचा आहे, अर्ज भरल्यानंतर काही दिवसातच कळेल की ठिबक सिंचन योजनेमध्ये नंबर लागला की नाही, त्यामुळे आत्ताच अर्ज करा .
व मिळावा ठिबक सिंचन ते सुद्धा 75 टक्के अनुदानामध्ये शासन राज्यात राबवित आहे त्यामुळे 75 टक्के अनुदानामध्ये राबवण्यात Thibak Sinchanयोजनेचा फायदा घ्यावा शेतामध्ये आत्ताच ठिबक सिंचन आणा ते सुद्धा 75 टक्के अनुदानामध्ये आता अर्ज करा.
वजन कमी करण्याचे उपाय करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
ठिबक सिंचन योजनेचे फायदे
शासना अंतर्गत राबविण्यात आलेल्या ठिबक सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, कारण ही योजना 75 टक्के सबसिडी मध्ये मिळणार आहे. अनुदान न घेता जर ठिबक सिंचन घेतो म्हटल्यास त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खर्च होतो, परंतु आता शासना अंतर्गत ठिबक सिंचन योजना 75 टक्के अनुदानामध्ये राबवून देण्यात आलेली आहे,
त्यामुळे या योजनेमध्ये फक्त 25 टक्केचरक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचतो; व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन सुद्धायेते,त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ होऊन शेतकरी पुढे जाऊ शकतात,व शेतकरी विकसित होऊ शकतात.शेतकऱ्यांनी जर पूर्ण दरामध्ये ठिबक सिंचन घेतो म्हटल्यास प्रत्येक शेतकरी घेऊ शकत नाही कारण ठिबक सिंचन पूर्ण दरात घेण्याकरिता खूप जास्त प्रमाणात खर्च करावा लागतो, व प्रत्येक शेतकऱ्याकडे एवढी रक्कम उपलब्ध नसते, त्यामुळे सर्व सामान्य व गरीब शेतकरी ठिबक सिंचन आपल्या शेतामध्ये लावू शकत नाही, याचा विचार करूनच शासनाने ठिबक सिंचन योजना देण्याचे ठरवलेले आहे, Thibak Sinchan योजनेचा लाभ गरीब शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
किती टक्के अनुदान मिळेल? व कोणाला मिळेल?
शासनाच्या निर्णयानुसार या योजनेचा लाभ गरीब शेतकरी येऊ शकतात,यामध्ये अल्पभूधारक शेतकरी खर्च मापदंडाच्या 55% मर्यादित देण्यात येते, त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येते.त्याचप्रमाणे पाच हेक्टर च्या मर्याने मध्ये योजना देण्यात येत.
इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरुवात ही पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने द्वारा येणाऱ्या ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता. त्यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान,व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान याव्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान देण्यात येते,शासनाचा हा निर्णय अत्यंत चांगला आहे, गरीब शेतकरी सुद्धा घेऊ शकतात, ही एक महत्त्वाची बाब आहे.
ठिबक सिंचन योजनेचे 75 टक्के अनुदान कोणाला मिळणार? शेतीला किती मर्यादा असणार आहे?
एसएससी,एसटी, अल्पवयीन त्याचप्रमाणे महिला या शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेची अट म्हणजे ठिबक सिंचन मिळवण्या करिता शासनाच्या अध्यादेशानुसार अनुदानही पाच हेक्टर क्षेत्रावर दिले जाते, त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर दिले जात नाही या शेतकऱ्यांकडे लागवडीसाठी 0.2 हेक्टर जमीन आहे त्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेता येणार असून, त्यांना ठिबक सिंचन योजना शेतामध्ये बसवतात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या
आधार कार्ड
शेतकरी एससी एनटी कॅटेगिरीचे असेल तर जात प्रमाणपत्र
आठ अ
सातबारा
विज बिल
अनुदान मिळवण्याचे वेळेला पूर्वसंमती पत्र.
ठिबक सिंचन योजनेचा ऑनलाईन अर्ज
ठिबक सिंचन ऑनलाईन अंतर्गत 75 टक्के अनुदान दिले जाते या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदारांनी
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या लिंक वर या लिंक वर गेल्यानंतर आवश्यक ती माहिती तुम्ही योग्य प्रकारे यात भरा, व तुमचा फॉर्म सबमिट करा नंतर तुम्ही या योजनेचे पात्र असाल की नाही, हे तुम्हाला कळणार तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की तुम्ही योजने करता पात्र आहात तुम्हाला पूर्व समिती मिळेल पूर्वर संमती मिळणे नंतर तुम्ही ज्या ठिबक सिंचन योजनेचा अर्ज केला असेल ती ठिबक सिंचन योजना तुम्हाला शेतात घेऊन लावावी लागेल, व नंतर तुम्हाला तीस दिवसाच्या आत मध्ये बिल सादर करावे लागेल नंतर तुम्हाला 75 टक्के अनुदान देण्यात येईल.