Adhar card युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (Unique Identification Authority of India) स्टँडर्ड फी काढून टाकली आहे. जर तुम्हाला १४ डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करायचं असेल तर तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावं लागणार नाही. या काळात नागरिकांना मोफत त्यांची डेमोग्राफीक माहिती, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक आणि ईमेल दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे आणि यासाठी त्यांना कोणतंही वेगळं शुल्क भरावं लागणार नाही.
तर, आधारमधील सर्व डेमोग्रफीक माहिती अपडेट करणं पूर्णपणे विनामूल्य आहे आणि तुम्ही ते घरी बसून ऑनलाइन करू शकता. दरम्या, जर एखाद्याला फोटो, iris किंवा इतर बायोमेट्रिक तपशील अपडेट करायचे असतील, तर त्याला आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल आणि त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं शुल्कही भरावं लागेल. बायोमेट्रिक अपडेटसाठी विशेष उपकरणांची आवश्यकता असते आणि ते फक्त नोंदणी केंद्रांवर उपलब्ध असतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
त्या ठिकाणी त्या उपकरणांच्या मदतीनं बोटांचे ठसे स्कॅन केले जातात.१० वर्षांनी अपडेट अनिवार्यफसवणूक टाळण्यासाठी, बायोमेट्रिक अपडेट प्रक्रियेकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. UIDAI ने दर १० वर्षांनी आधार कार्डाची माहिती अपडेट करणं अनिवार्य केलं आहे. तुमची माहिती योग्य आणि अपडेटेड आहे याची देखील तुम्हाला खात्री करणं आवश्यक आहे.
आधारद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी अपडेट्सही आवश्यक आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास तुम्हाला पत्ता बदलावा लागेल. तुम्ही ही माहिती UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून अपडेट करू शकता. दरम्यान, मोफत अपडेटची तारीख देखील १४ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.