Maharashtra News : शासनाकडून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अशा योजना सुरू केल्या जातात. जळगाव जिल्ह्यातही आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींसाठी सायकल वाटप करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आठवी ते बारावी वर्गापर्यंतच्या गरजू मुलींसाठी सायकल वाटप केली जाणार आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे
👇 फक्त पाचशे रुपये मध्ये बसवा सौर पॅनल👇
सायकल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- राशन कार्ड चे झेरॉक्स
शैक्षणिक वर्षात 4651 सायकल देण्याचा दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शासनाकडे पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाला आता मान्यता मिळाली असून शासनाकडून जिल्हा परिषदेला शाळकरी गरजू मुलींना सायकल वाटप करण्यासाठी दोन कोटी 32 लाख 95 हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
👇अतिक्रमण केलेली जमीन अशा प्रकारे परत मिळणार👇
8वी ते 12वी पर्यंतच्या लाभार्थी मुलीला 4 वर्षात सायकल खरेदीसाठी एकदा अनुदान दिले जाईल गरजू मुलींना सायकल वाटप करताना गाव/वाड्या/तांडे/पाडे येथे राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य दिले जाईल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र ला भेट द्या.